Tuesday, January 31, 2012

मृगनयन

मृगनयनी नयन तुझे
करिते मृगया मम मनाची,
अधीर हृदय माझे

भ्रांत नसे मज काळाची ...

कळ

अहा तुझा लाजणं 
तरंग उठतात मनात ,
तुझ्या डोळ्यातील अबोल प्रीत
कळ थेट माझ्या हृदयात ...

श्रावण

चिंब भिजवणारा, हवासा वाटणारा
माझ्यासोबत नव्याने स्वप्ना रंगवणारा ,
थेंबा-थेंबातून मनात उतरणारा
माझा श्रावण मलाच भेटणारा ...


Wednesday, January 25, 2012

काहूर



छन छन छन पाऊस
नकळत बरसून गेला ,
मनात अस्पष्टसे
काहूर माजवून गेला...
- प्राची (धुंद फुलपाखरू)

Monday, January 23, 2012

गाडं

तुझ्या माझ्या नात्यात
सगळं कसं अवचित घडतं,
मी गप्पं बसले कि
तुझं गाडं अडतं ...