शब्द्चकोर....
शब्द शब्द जोडून उमलल्यात ओळी, हृदयाच्या स्पंदनातून फुलली ग चारोळी..
Saturday, February 4, 2012
क्षण
एकदा आमच्या भांडणात
शब्दच रुसून बसले ,
हळुवार जवळ घेताच त्याला
शब्द खुद्कन हसले ...
गुलाब
ढळणारे अश्रू
भिजलेले मन..
गुलाबला काय ठाव ते
मुग्ध रुपेरी क्षण...
Tuesday, January 31, 2012
मृगनयन
मृगनयनी नयन तुझे
करिते मृगया मम मनाची,
अधीर हृदय माझे
भ्रांत नसे मज काळाची ...
कळ
अहा तुझा लाजणं
तरंग उठतात मनात ,
तुझ्या डोळ्यातील अबोल प्रीत
कळ थेट माझ्या हृदयात ...
श्रावण
चिंब भिजवणारा, हवासा वाटणारा
माझ्यासोबत नव्याने स्वप्ना रंगवणारा ,
थेंबा-थेंबातून मनात उतरणारा
माझा श्रावण मलाच भेटणारा ...
Wednesday, January 25, 2012
काहूर
छन छन छन पाऊस
नकळत बरसून गेला ,
मनात अस्पष्टसे
काहूर माजवून गेला...
-
प्राची
(धुंद फुलपाखरू)
Monday, January 23, 2012
गाडं
तुझ्या माझ्या नात्यात
सगळं कसं अवचित घडतं,
मी गप्पं बसले कि
तुझं गाडं अडतं
...
Home
Subscribe to:
Posts (Atom)